आहे आरुप बोलणें । नव्हे नाणें टांकसाळी ॥१॥ नका घेऊं खयासाठीं । येईल तुटी एखादी ॥२॥ आहतां ठसा कळे वरी । अभ्यंतरीं गैरसाळ ॥३॥ निळा म्हणे निवडुनी ठेवा । आतां देवा एकीकडे ॥४॥