आबध्द वाचा मतिहीन । बुध्दी मळीण विषय लोभें ॥१॥ परि तुम्ही कृपावंत । कां हें वदवितां मी नेणें ॥२॥ न कळे अर्थप्रमेय तंतु । हेतु मातु दृष्टांतही ॥३॥ निळा म्हणे पुरुषोत्तमा । जाण महिमा तुमचा तुम्ही ॥४॥