आवडोन रुप मनीं – संत निळोबाराय अभंग – ६४२

आवडोन रुप मनीं – संत निळोबाराय अभंग – ६४२

आवडोन रुप मनीं ।
धरिलें वदनीं हरिनाम ॥१॥
न लगे आणिक कांही चिंता ।
गोडचि आतां यावरी ॥२॥
काय करुं ते आसनमुद्रा ।
कृपासमुद्रा तुजविण ॥३॥
निळा म्हणे दिधलें संती ।
नाम एकंतीं तेंचि गोड ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आवडोन रुप मनीं – संत निळोबाराय अभंग – ६४२