तुम्हांवीण कोणा सत्ता । आहे अनंता यदर्थी ॥१॥ जन्ममरणा हरुनियां । करी निज छाया कृपेची ॥२॥ कोण ऐसा आहे त्राता । भयभवहर्ता तुजवीण ॥३॥ निळा म्हणे म्हणोनि आलों । तुमचा झालों शरणागत ॥४॥