पहावीं पाउलें नयनीं हेंचि – संत निळोबाराय अभंग – ६३९

पहावीं पाउलें नयनीं हेंचि – संत निळोबाराय अभंग – ६३९

पहावीं पाउलें नयनीं हेंचि आर्त ।
देखिलिया चित्त्‍ा समाधान ॥१॥
क्षणभंगुर हा येथींचा पसारा ।
याचिलागीं करा त्वरा आतां ॥२॥
पाहोनि श्रीमुख धरीन ह्रदयीं ।
मग हो भलतें कांही देहा प्राणा ॥३॥
आल्याचें सार्थक हेंचि नरदेहा ।
नाहीं तरि हाहाभूत सर्व ॥४॥
म्हणोनि लवलाहो करितों याचिसाठीं ।
तुमच्या व्हावी भेटी पायापाशीं ॥५॥
निळा म्हणे आतां विलंब न करावा ।
येऊनियां देवा सांगावे ॥६॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पहावीं पाउलें नयनीं हेंचि – संत निळोबाराय अभंग – ६३९