पांडुरंगा दयाघना । गुणनिधाना सुखसिंधु ॥१॥ भाव माझा जाणोनियां ठेवा जी पायां जवळिकें ॥२॥ भक्तवत्सल मनमोहना । राजीवनयना निजात्मया ॥३॥ निळा म्हणे करुणाकरा । विश्वंभरा विश्वजनित्या ॥४॥