करुं येईल अंगिकार – संत निळोबाराय अभंग – ६३६
करुं येईल अंगिकार ।
तरी करा फार काय बोलों ॥१॥
नाहीं घोंकिलें ऐकिलें कांहीं ।
सेवा घडली नाहीं वैष्णवांची ॥२॥
स्वधर्म विधी न कळें आचार ।
कैसा तो प्रकार साधनाचा ॥३॥
निळा म्हणें आहें मूढ दगड ।
ठायींचीच जड बुध्दी माझी ॥४॥