गाईन कीर्तनीं गुण नाम पवाडे ।
तुमचे तुम्हां पुढे आवडीनें ॥१॥
भावा ऐसे माझया व्हा जी पांडुरंगा ।
मग मी आलें भागा करीन तें ॥२॥
नाचेन सन्मुख चराणावरी दृष्टी ।
धरुनि प्रेम पोटीं आळवीन ॥३॥
निळा म्हणे तुम्हीं चरित्रे अपार ।
केलीं ते प्रकार आठविन ॥४॥