कृपावंता दया मोठी – संत निळोबाराय अभंग – ६३३

कृपावंता दया मोठी – संत निळोबाराय अभंग – ६३३

कृपावंता दया मोठी ।
आदर पोटी दासाचा ॥१॥
म्हणोनियां सांभाळ करा ।
नेदा अविचारा आतळों ॥२॥
आपुलीये सेवेवीण ।
न ठेवा क्षण पळ एक ॥३॥
निळा म्हणे प्रेमरसें ।
जेववा सरिसें सांगातें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कृपावंता दया मोठी – संत निळोबाराय अभंग – ६३३