कोठें विगुंतली । नेणों कोणें गोंवियेली ॥१॥ माझी न करीं आठवण । गेली बाळका विसरोन ॥२॥ न लावावा उशीर । नेणों कां झाली निष्ठुर ॥३॥ निळा म्हणे काय माझें । भार मानियलें ओझें ॥४॥