कीर्ति ऐकोनि आलों दारा । माझा करा सांभाळ ॥१॥ जतन करीन तुमचें नाम । धरुनी प्रेम निज कंठी ॥२॥ भाव माझा वोलेसी ठेवा । घ्या हो सेवा दिननिशीं ॥३॥ निळा म्हणे संकल्पेसी । पायांपासीं कंठीन ॥४॥