कराल तरी कृपा देवा । हात ठेवा मस्तकीं ॥१॥ मग मी राहेन निश्चितें । तुमच्या दानें वरदाच्या ॥२॥ धरुनियां राहेन कंठी । नामें पोटीं उच्चार ॥३॥ निळा म्हणे ऐसा हेत । उत्कांठित मानसीं ॥४॥