एक देशी आम्ही एकट एकले । आशेचे बांधले जन्मोजन्मीं ॥१॥ म्हणउनी इच्छुं तुमचा आश्रय । पाहविसे पाय वाटताती ॥२॥ बहुकाळवरी वियोगें पीडलों । जराव्याधी केलों कासाविस ॥३॥ निळा म्हणे न या सोडवणें हरि । तरि मज संसारी हेंचि भवे ॥४॥