एकदां तरी देखिल्याविण – संत निळोबाराय अभंग – ६२५
एकदां तरी देखिल्याविण ।
कैसेनि मी कोण ओळखें ॥१॥
अमृताचि ऐकिल्या गोडी ।
रसने ते फुडी केंवि लाभे ॥२॥
क्षीराब्धी हे शेषश्यन ।
जगीं न देखोन अनोळखा ॥३॥
निळा म्हणे त्यापरि देवा ।
नये स्वानुभवा काय करुं ॥४॥