एकदां तरी दाखवा – संत निळोबाराय अभंग – ६२४

एकदां तरी दाखवा – संत निळोबाराय अभंग – ६२४

एकदां तरी दाखवा डोळां ।
तोचि वेळोवेळां आठवीन ॥१॥
सवरुप तुमचें पुरुषोत्तमा ।
अहो मनोरमा विश्वाचिया ॥२॥
मग ती तुम्हां न करीं पीडा ।
संदेह येवढा निवारिल्या ॥३॥
निळा म्हणे अंतर जाणा ।
यदर्थी कृपणा नये होऊं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एकदां तरी दाखवा – संत निळोबाराय अभंग – ६२४