गोपाळपुरनिवासिया । अगा ठाकलिया विटेवरीं ॥१॥ पदयनाभा शेषशयना । अगा ये सूदना दैत्यकुळा ॥२॥ चतुर्दशभुवना व्यापका देवा । माझिया भक्तिभावा चित्त दयावें ॥३॥ निळा म्हणे अपरिमिता । अगा ये अनंता महदादी ॥४॥