संत निळोबाराय अभंग

गोपाळपुरनिवासिया – संत निळोबाराय अभंग – ६२३

गोपाळपुरनिवासिया – संत निळोबाराय अभंग – ६२३


गोपाळपुरनिवासिया ।
अगा ठाकलिया विटेवरीं ॥१॥
पदयनाभा शेषशयना ।
अगा ये सूदना दैत्यकुळा ॥२॥
चतुर्दशभुवना व्यापका देवा ।
माझिया भक्तिभावा चित्त दयावें ॥३॥
निळा म्हणे अपरिमिता ।
अगा ये अनंता महदादी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गोपाळपुरनिवासिया – संत निळोबाराय अभंग – ६२३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *