गोपीवल्लभा कमलाकान्ता – संत निळोबाराय अभंग – ६२२

गोपीवल्लभा कमलाकान्ता – संत निळोबाराय अभंग – ६२२

गोपीवल्लभा कमलाकान्ता ।
अनाथनाथा श्रीविठठला ॥१॥
तुमचा दास झालों आतां ।
करा जी सरता पायापें ॥२॥
गाऊनियां नामावळी ।
नाचेन टाळी वाजवित ॥३॥
निळा म्हणे घ्याल सेवा ।
पात्र दैवा तैं झालों ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गोपीवल्लभा कमलाकान्ता – संत निळोबाराय अभंग – ६२२