आम्ही नेणों भाव कैसा – संत निळोबाराय अभंग – ६२१
आम्ही नेणों भाव कैसा भक्तिरस ।
म्हणवूं तुमचे दास एक्या गुणें ॥१॥
मुखें गाऊं नाम पवाडे श्रीहरी ।
मुखें गाऊं नाम पवाडे श्रीहरी ।
उभे महाव्दारीं ठाकोनिया ॥२॥
नेणों ज्ञान ध्यानमंत्र योगकळा ।
आसन मुद्रा डोळा लक्ष कैसें ॥३॥
तत्व संख्या नेणो नित्यानित्यज्ञान ।
आठऊं चरण सकुमार ते ॥४॥
निळा म्हणे अगा रुक्मादेविवरा ।
आतां उचित करा आपुलें तें ॥५॥