आम्हीं न मागों ऐसा – संत निळोबाराय अभंग – ६२०

आम्हीं न मागों ऐसा – संत निळोबाराय अभंग – ६२०

आम्हीं न मागों ऐसा कधीं ।
कृपानिधी वर दयाल ॥१॥
आपुल्या पायीं वसवा चित्त ।
माझें अखंडित दुजें न मार्गो ॥२॥
युर्गे जातां कल्प कोडी ।
न करुं जोडी आणिक ॥३॥
निळा म्हणे राहो ध्यानीं ।
तुमचें मनीं रुपडें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आम्हीं न मागों ऐसा – संत निळोबाराय अभंग – ६२०