संत निळोबाराय अभंग

येरीकडे आनंद गोकुळीं – संत निळोबाराय अभंग ६२

येरीकडे आनंद गोकुळीं – संत निळोबाराय अभंग ६२


येरीकडे आनंद गोकुळीं ।
गोप उठोनि प्रात:काळी ।
मिळले नंदाच्या राऊळीं ।
करिती जागे श्रीकृष्ण ॥१॥
दसवंती म्हणे गोकुळांसी ।
निद्रित आहे हषिकेशी ।
पुढें जा घेउनी गोधनासी ।
जाग झालिया येईल ॥२॥
काल बहुत श्रमला कृष्ण ।
वात्सेसीं करितां संघाटण ।
बळें वांचला सांगती जन
केलें मर्दन मग त्याचें ॥३॥
तेव्हा कळला तो असुर ।
होउली वत्स आला क्रूर ।
कृष्णें ताडितां निशाचर ।
एक योजन पडियला ॥४॥
ऐकोनि म्हणती गोरक्ष ।
सत्वर पाठवीं यदुनायक ।
आम्ही जातों अवश्यक ।
पश्चिम दिशेसी सांगावे ॥५॥
मग ते हाकूनियां खिल्लारें ।
सवेग चालिले एंकाचि भारें ।
चौताळती गोधनें थोरें ।
आवेशेंसी धांवती ॥६॥
निळा म्हणे नेधती पुढें ।
अवघें पसरिलें ते जाभडें ।
तळी महीवरी जेवढें ।
मेघमंडपापर्यंत ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

येरीकडे आनंद गोकुळीं – संत निळोबाराय अभंग ६२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *