आम्ही नेणतीं नेणतीं । सुजाण तुम्ही कमळापती ॥१॥ अवघे अंतरीचें जाणा । सर्वसाक्षी तूं देखणा ॥२॥ माझें करितां समाधान । लाभ कोणी होईल मान ॥३॥ कांहे बोलियेला निळा । तुम्हीं जाणतां कळवळा ॥४॥