दीन मी अनाथ तुमचें रंक । मागतों भीक मज दयावी ॥१॥ नेऊनि घाला पायांवरी । निरवा श्रीहरी कृपाघना ॥२॥ नुपेक्षावें शरणांगतां । जरी मी नेणता दास तुमचा ॥३॥ निळा म्हणे अवघे संत । मिळोनि स्वहित करा माझें ॥४॥