त्रिभुवनपति अहो देवा । दीनबांधवा विठोजी ॥१॥ भावा माझया दया जी थार । आपुल्या निरंतर चरणापें ॥२॥ तेणें सार्थक होईल काळ । सुमंगळ देह माझा ॥३॥ निळा म्हणे सुफळ जिणें । होईल स्मरणें नामाचिया ॥४॥