त्रिभुवनपति अहो देवा – संत निळोबाराय अभंग – ६१६
त्रिभुवनपति अहो देवा ।
दीनबांधवा विठोजी ॥१॥
भावा माझया दया जी थार ।
आपुल्या निरंतर चरणापें ॥२॥
तेणें सार्थक होईल काळ ।
सुमंगळ देह माझा ॥३॥
निळा म्हणे सुफळ जिणें ।
होईल स्मरणें नामाचिया ॥४॥
त्रिभुवनपति अहो देवा ।
दीनबांधवा विठोजी ॥१॥
भावा माझया दया जी थार ।
आपुल्या निरंतर चरणापें ॥२॥
तेणें सार्थक होईल काळ ।
सुमंगळ देह माझा ॥३॥
निळा म्हणे सुफळ जिणें ।
होईल स्मरणें नामाचिया ॥४॥