तुमचे पायीं आमुचें निज । नाहीं काज लौकिकीं ॥१॥ रिध्दिसिध्दी फुकासाठीं । नेघों गोठी नाईकों त्या ॥२॥ लेववा भक्तिचीं लक्षणें । तींहि भूषणें आवडती ॥३॥ निळा म्हणे कृपानिधी । फेडा आधि हे माझी ॥४॥