तुम्ही देवा प्रत्यक्ष असा । परि मी कैसा ओळखों ॥१॥ जेव्हां प्रगटोनि भेटी दयाल । तेव्हांचि फावाल सुरवाडें ॥२॥ निर्धना निक्षेप असोनि धन । जेंवि तें न देखोन दैन्य भाकी ॥३॥ निळा म्हणे झाली परी । तैसीच मज हरि नेणतां ॥४॥