तुमच्या पायीं माझें हित । होईल निश्चित हेंचि वाटें ॥१॥ आणखी कोणा शरण जाऊं । आहे उपाऊ तुम्हां हातीं ॥२॥ सहज कृपा अवलोकाल । तरी पाववाल निजठाया ॥३॥ निळा म्हणे संचित माझें । आड श्रीराजे न घालावें ॥४॥