हेचि चिंता दिवस – संत निळोबाराय अभंग – ६११
हेचि चिंता दिवस रातीं ।
राहिली चितीं न ढळे ते ॥१॥
कराल माझा अंगीकार ।
किंवा दूर भोवंडाल ॥२॥
बहुत जन्म घेतां कष्टी ।
झालों हिंपुटी दु:ख शोकें ॥३॥
निळा म्हणे यावरी आतां ।
राख अनंता चरणापें ॥४॥
हेचि चिंता दिवस रातीं ।
राहिली चितीं न ढळे ते ॥१॥
कराल माझा अंगीकार ।
किंवा दूर भोवंडाल ॥२॥
बहुत जन्म घेतां कष्टी ।
झालों हिंपुटी दु:ख शोकें ॥३॥
निळा म्हणे यावरी आतां ।
राख अनंता चरणापें ॥४॥