पाळोनिया लळे – संत निळोबाराय अभंग – ६१०

पाळोनिया लळे – संत निळोबाराय अभंग – ६१०


पाळोनिया लळे ।
बहुतें वाढविलीं बाळें ॥१॥
मजचि कां वो मोकलिलें ।
विउनी उदासचि टाकिलें ॥२॥
नाहीं दिलें स्तनपान ।
नेणें खाऊं जेऊं अन्न ॥३॥
निळा म्हणे दुजें कोण ।
करील सांगा प्रतिपाळण ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पाळोनिया लळे – संत निळोबाराय अभंग – ६१०