सोरत आलों तुमच्या नामें । पुरें ग्रामें ठाकित ॥१॥ आंतां चरण दावा दिठी । घाला कंठी निर्माल्य ॥२॥ उसंतितां रानें वनें । पुरलें पेणें येथवरीं ॥३॥ निळा म्हणे आलिंगन । दया हो घालून कर कंठीं ॥४॥