सोरत आलों तुमच्या – संत निळोबाराय अभंग – ६०९
सोरत आलों तुमच्या नामें ।
पुरें ग्रामें ठाकित ॥१॥
आंतां चरण दावा दिठी ।
घाला कंठी निर्माल्य ॥२॥
उसंतितां रानें वनें ।
पुरलें पेणें येथवरीं ॥३॥
निळा म्हणे आलिंगन ।
दया हो घालून कर कंठीं ॥४॥
सोरत आलों तुमच्या नामें ।
पुरें ग्रामें ठाकित ॥१॥
आंतां चरण दावा दिठी ।
घाला कंठी निर्माल्य ॥२॥
उसंतितां रानें वनें ।
पुरलें पेणें येथवरीं ॥३॥
निळा म्हणे आलिंगन ।
दया हो घालून कर कंठीं ॥४॥