सांगावें उगउनी न कळे तयासी । तुम्ही तो मानसीं साक्ष माझें ॥१॥ विश्वाचे व्यापक चाळक चित्ताचें । साक्षी अंतरींचें जेथें तेथें ॥२॥ ब्रम्हादिक देव तेहि आज्ञाधार । तुमचे किंकर काळ काम ॥३॥ निळा म्हणे माझा करा अंगिकार । हेंचि निरंतर विनवितसे ॥४॥