सत्य आणि मिथ्या जाणा – संत निळोबाराय अभंग – ६०६

सत्य आणि मिथ्या जाणा – संत निळोबाराय अभंग – ६०६

सत्य आणि मिथ्या जाणा अंतरींचे ।
तुम्ही सकळांचे सर्वजाणा ॥१॥
म्हणऊनियां करा अनाथचा धांवा ।
उठाउठीं देवा पाचारितां ॥२॥
न चले झांकिलें तुम्हांपुढे कांहीं ।
असा अंतर्बाहीं व्यापूनियां ॥३॥
जिवीं एक दावी बोलोनि आणीक ।
तरि मज सकळिक दुषिति संत ॥४॥
निळा म्हणे माझें सबाह्य अंतर ।
तुम्ही निरंतर जाणतसां ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सत्य आणि मिथ्या जाणा – संत निळोबाराय अभंग – ६०६