सर्वकाळ चित्त ठायीं – संत निळोबाराय अभंग – ६०४

सर्वकाळ चित्त ठायीं – संत निळोबाराय अभंग – ६०४

सर्वकाळ चित्त ठायीं ।
राहों पायीं तुमचिये ॥१॥
ऐसे करा कृपादान ।
कर जोडून विनवितों ॥२॥
सर्वकाळ ध्यानीं मनीं ।
न पडो चिंतनी विसर ॥३॥
निळा म्हणे पंढरीराजा ।
करा हो अंगीकार माझा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सर्वकाळ चित्त ठायीं – संत निळोबाराय अभंग – ६०४