विश्वास माझा जतन करा । विश्वंभरा पायापें ॥१॥ मग मी तुम्हां न वजे दुरी । ठेवीन वरी जीवभाव ॥२॥ आळवीन उत्तम नामें । तुमचीच प्रेमें सन्मुख ॥३॥ निळा म्हणे कूर्मदृष्टी । करा वृष्टी अमृतें ॥४॥