विश्वास अंतरींचा जाणोनी ।
नाम ठेवा माझया वदनीं ।
रुप मनाचे आसनीं ।
कृपा करुनी बैसवा ॥१॥
रुप मनाचे आसनीं ।
कृपा करुनी बैसवा ॥१॥
करीन तैसी घ्यावी सेवा ।
विश्वास पालटों न दयावा ॥
आईका विनविलें तें देवा ।
अहो पंढरीनिवासा ॥२॥
माझिये बुध्दीसी धैर्य दयावें ।
सेवेसी इंद्रियां राबवावें ॥
आपुलिये कीर्तनीं राखावें ।
प्रेम माझें सर्वदा ॥३॥
गर्व अभिमान दवडावा ।
आळस निद्रा परती ठेवा ।
विसर तुमचा न पडे देवा ।
देई सेवा हें दान ॥४॥
निळा म्हणे कृपासिंधु ।
तुम्ही साचार दीनबंधु ।
आहा म्हणोनि घेतला छंदु ।
येवढें आर्त पुरवावें ॥५॥