राहोनियां संत्संगतीं । गावी कीर्तीं तुमचीच ॥१॥ हेंचि देंई नलगे दुजें । अंतर माझें जाणोनी ॥२॥ धन मान नलगे देवा । अवघा ठेवा गुंडुनी ॥३॥ निळा म्हणे जगदाधीशा । हेचि आशा बहुकाळ ॥४॥