येउनी केव्हां भेटी दयाल । समोखाल मज आतां ॥१॥ वाट पाहे दिवसरातीं । नलगे चित्तीं अन्न गोड ॥२॥ धन मान गोत वित्त । न रुचे मात मज त्याची ॥३॥ निळा म्हणे जीवदान । दया मज भेटोन आतां ॥४॥