येउनी केव्हां भेटी – संत निळोबाराय अभंग – ५९८
येउनी केव्हां भेटी दयाल ।
समोखाल मज आतां ॥१॥
वाट पाहे दिवसरातीं ।
नलगे चित्तीं अन्न गोड ॥२॥
धन मान गोत वित्त ।
न रुचे मात मज त्याची ॥३॥
निळा म्हणे जीवदान ।
दया मज भेटोन आतां ॥४॥
येउनी केव्हां भेटी दयाल ।
समोखाल मज आतां ॥१॥
वाट पाहे दिवसरातीं ।
नलगे चित्तीं अन्न गोड ॥२॥
धन मान गोत वित्त ।
न रुचे मात मज त्याची ॥३॥
निळा म्हणे जीवदान ।
दया मज भेटोन आतां ॥४॥