मी तों दीन नेणें रंक । परि तुम्ही चाळक ब्रम्हांडा ॥१॥ केले अपराध क्षमा करा । काय म्यां दातारा विनवावें ॥२॥ येवढेंचि आहे माझे हातीं । यावें काकुळती तुम्हांसी तें ॥३॥ निळा म्हणे उचिता जागा । आपुल्या हो श्रीरंगा पंढरीच्या ॥४॥