माझे मस्तक तुझया पायीं । ऐसें करी गा विठाबाई ॥१॥ अहर्निशीं तुझें ध्यान । मुखें नामसंकीर्तन ॥२॥ ह्रदयीं वसावें येऊन । करीं माझें समाधान ॥३॥ निळा म्हणे हे वासना । माझी पुरवीं नारायणा ॥४॥