माझे बोल नव्हती – संत निळोबाराय अभंग – ५९५

माझे बोल नव्हती – संत निळोबाराय अभंग – ५९५

माझे बोल नव्हती फोल ।
जाणें विठ्ठल अंतरींचे ॥१॥
पुरवील तोचि मनींचा हेत ।
येईल धांवत करुणाब्धी ॥२॥
वागवितो दया पोटीं ।
आम्हांसाठी कृपाळु ॥३॥
निळा म्हणे भरंवसेनि ।
नामें वदनीं आळवितां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

माझे बोल नव्हती – संत निळोबाराय अभंग – ५९५