माझिया भावाचें खंडण – संत निळोबाराय अभंग – ५९४

माझिया भावाचें खंडण – संत निळोबाराय अभंग – ५९४


माझिया भावाचें खंडण ।
नव्हे ऐसें करा दान ।
मुखी नाम तुमचें स्‍मरण ।
राहो चरणावरीं दृष्टी ॥१॥
आणखी मी न मागें कांहीं ।
वसो प्रेम तुमच्या ठायीं ।
करुनि कृपा आठव देई ।
आवडी कीर्तनीं सर्वदां ॥२॥
सुखें भोगीन प्रारब्धठेवा ।
येईल तैसा वोढवोनि देवा ।
मानामान न करीं हेवा ।
विसर न पडावा तुमचाची ॥३॥
काय करतील निंदक जन ।
आसना ठायीं सावधान ।
तुमचें करितां नित्य चिंतन ।
कैंचें बंधन आम्हां दासां ॥४॥
गाईन गुण तुमचे गीतीं ।
विषय-वासना-दिकां शांती ।
तुमच्या पायीं जडतां प्रीती ।
निळा विनंति करी ऐसी ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

माझिया भावाचें खंडण – संत निळोबाराय अभंग – ५९४