माझीया मना समाधान । दयावें वचन अभयाचें ॥१॥ निर्भय तेणें राहेन सुखें । हरिनाम मुखें आळवित ॥२॥ नलगे महिमा मान प्रतिष्ठा । न म्हणे वैकुंठा मज न्या हो ॥३॥ निळा म्हणे आपुल्या पायीं ॥ ठेवाल ठायीं राहेन ते ॥४॥