भोगायतन शरीर माझें – संत निळोबाराय अभंग – ५९१

भोगायतन शरीर माझें – संत निळोबाराय अभंग – ५९१

भोगायतन शरीर माझें ।
व्यर्थचि ओझें वागविलें ॥१॥
सार्थक होय याचें तैसें ।
कराचि सौरसें आपुलिया ॥२॥
करुनियां कृपादान ।
सांभाळा दीन अनाथा ॥३॥
निळा म्हणे चरणीं ठेवा ।
स्मरणीं देवा नामाचे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भोगायतन शरीर माझें – संत निळोबाराय अभंग – ५९१