भोळा भाव माझा – संत निळोबाराय अभंग – ५९०

भोळा भाव माझा – संत निळोबाराय अभंग – ५९०


भोळा भाव माझा ।
जाणा तुम्ही गरुडध्वजा ॥१॥
काय जाणे वेद नीती ।
योगकळा आत्मस्थिती ॥२॥
करितो कीर्तन ।
नामीं तुमचें अनुसंधान ॥३॥
निळा म्हणे कराल कृपा ।
म्हणेनियां वैकुंठभूपा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भोळा भाव माझा – संत निळोबाराय अभंग – ५९०