ऐसे वैरिया मुक्तिदानीं – संत निळोबाराय अभंग ५९
ऐसे वैरिया मुक्तिदानीं ।
कृपावंत हां सारंगपाणी ।
कंसे ऐकानिया श्रवणी ।
परम खेद मानिजे ॥१॥
कृष्णजवळी होती मुलें ।
तिहीं तें आश्चर्य देखिलें ।
वडिलां सांगती नवल झालें ।
कृष्णासान्निध तंव ते ।
तेणें अति लाववें कवतुकें ।
भूमीसी आपटूनि मारिलें ॥३॥
त्यांची शरीरें पर्वतराशी ।
पडिल्या आहेत गांवापाशीं ।
चला दाखवितों तुम्हासीं ।
म्हणवूनि सकळिकांसी हाकारिलें ॥४॥
तिहीं ते देखोनियां दिठी ।
भयें कांपती आपुल्या पोटीं ।
म्हणती अतुर्बळी हा जगजेठी ।
लेंकरुं कैसा म्हणावा ॥५॥
नंदहि विस्मयापत्र चितीं ।
म्हणे हे कोठूनि असूर येती ।
याचिया हाते पावेनि शांती ।
जाताती मुक्तिपदातें ॥६॥
निळा म्हणे गांवींचे लोक ।
करिती अवघेंचि कौतुक ।
परी कंसा अधिकाधिक् ।
क्षतें उमळती दु:खाची ॥७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
ऐसे वैरिया मुक्तिदानीं – संत निळोबाराय अभंग ५९