भक्तप्रिये ये वो आई । विठाबाई कृपाळे ॥१॥ न साहे वियोग प्राण फुटे । उदास वाटे तुजविण ॥२॥ कोणा जीवनभोजन मागों । कोणा सांगों जडभारी ॥३॥ निळा म्हणे धांवोनि यावें । मज हें दयावें जीवदान ॥४॥