ब्रम्हादिकां न लभे तुमचें दर्शन । तेथें काय दीन अनाथ मी ॥१॥ रुसोनी इच्छितों भेटीचें गौरव । भक्तहीन भाव अपुरता ॥२॥ काजवे पाचारी जेंवि दिनकरा । निज परंपरा नाठवुनी ॥३॥ निळा म्हणे तैसे अपराध हे माझे । न धरावे श्रीराजें मनावरीं ॥४॥